धक्कादायक : बँकेतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक झाली असून पोलीस दल, जिल्हापरिषद , मनपा, येथे कोरोनाचा शिरकाव झाला असतानाच राहुरीत एका बँकेत तब्बल चार रुग्ण आढळले आहेत. 

राहुरी शहरातील बसस्थानकासमोरच्या एका बँकेतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे गुरूवारी तपासणीदरम्यान उघड झाले. चारपैकी दोन जण राहुरी शहरातील रहिवासी आहेत.

या बँकेत जंतुनाशक फवारणी करण्यात आली. बँक काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा फलक लावण्यात आला.

शहरातील दोघांच्या कुटुंबीयांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, तालुक्यातील दहा रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe