अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-श्रीगोंदे तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या लाटेला ओहोटीची चिन्हे दिसत नाहीत. शनिवारी घेतलेल्या १४८ रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये २१ रुग्ण संक्रमित सापडले.
त्यात श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे एक अधिकारी व एका कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. गेली चार महिने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी व नागरिकांना शिस्त लावणाऱ्या
पोलिसांनाच आज लागण झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी ंनी ड्युटीवर असतांना कशी काळजी घ्यावी, याबाबत पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी शनिवारी मार्गदर्शन केले.
संसर्ग झालेले अधिकारी व त्यांचा सहाय्यक हे काही दिवसांपूर्वी नगर-पुणे चेक पोस्टवर ड्युटीवर होते. तिथेच त्यांना संसर्ग झाल्याचा संशय आहे.
किरकोळ आजारी असल्याने अधिकारी यांनी एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू केले होते. परंतु शंका आल्याने त्यांनी व कर्मचाऱ्याने रॅपिड टेस्ट घेतली असता ते पॉझिटिव्ह आले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved