अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- माहेरवरून पैसे आणावेत यासह किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून नवर्याने चक्क आपल्या बायकोच्या डोक्यात लोखंडी हत्याराने घाव घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी हि घटना संगमनेर तालुक्यातील पूर्व भागाकडील असणार्या पानोडी गावात घडली आहे.मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ मोहीम याने आश्वी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
याबाबत धिक माहिती अशी कि, फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे की, पानोडी येथील सोमनाथ दिघे याचे अनिता उर्फ ज्योती हिचे 16 वर्षांपूर्वी थाटामाटात लग्न झाले. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत चालू होते. त्यानंतर एकदा गाय घेण्यासाठी सोमनाथने पैशाची मागणी केली.
परिस्थिती नसतानाही मुलीच्या संसारास अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी पैशाचीत तरतूद केली. त्यांनतर सोमनाथने नविन मोटर सायकल घेण्यास पैशाची मागणी झाली.
तीही पूर्ण करण्यात आल्यानेचं घटनेच्या महहिन्यापूर्वीचं उसनवारी, कर्ज मिटविण्याकरिता 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र ही मागणी पूर्ण करता आली नाही त्याचा राग धरुन सोमनाथ याने ज्योतीस मानसिक व शारिरिक छळ करण्यास सुरुवात केली.
एके दिवशी दोघांमध्ये वाद निर्माण झाला हा वाद एवढा विकोपास गेला की रागाच्या भरात सोमनाथने हातात लोखंडी हत्यार पत्नीच्या डोक्यासह कानाच्या मागे, पाठीवर, छातीवर मारले. या जोरदार घावामुळे ज्योती ही जागेवर कोसळली.
शेजार्यांनी ज्योतीस लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले मात्र त्यास विलंब झाल्याने डॉक्टरांनी तीस मृत घोषित केले.
ही वार्ता माहेरकडील लोकांना समजल्यानंतर त्यांनी ही घटना हत्याची असून पोलिस नोंद होणे महत्वाचे असून आरोपीसह सासरकडील मंडळींना त्वरीत अटक करावी अशी आक्रमक मागणी केली.
या घटनेनंतर पती, सासू-सासरे यांना ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर मोहीम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आश्वी पोलीस ठाण्यात आरोपी सोमनाथ शंकर दिघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|