अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना : होणाऱ्या जावयाने सासुवरच केला बलात्कार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-एका महिलेस तुझ्या मुलीबरोखर माझ्या मुलाचा विवाह लावुन देतो, असे म्हणून लग्नाचे अमिष दाखवून महिलेकडून १ लाख ६० हजाराचे सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज घेवून महिलेचा विश्‍वासघात करुन होणारा जावई पांडुरंग अंकुश खोरे याने घरात घुसून ४५ वर्ष वयाच्या विवाहित महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

या खळबळजनक प्रकरणी भिटेवाही परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षाच्या विवाहित महिलेने काल बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी पांडुंरग अंकुश खोरे, अंकुश खोरे, दोघे रा. काष्टी, ता. श्रीगोंदा व त्याच्या ओळखीचा एक अनोळखी इसम यांनी संगनमताने आरोपी अंकुश खोरे हा पीडित महिलेस म्हणाला की, पांडुरंग अंकुश खोरे याच्याचरोबर तुमच्या मुलीचे लग्न लावून देतो, असे अमिष दाखवून पीडित महिलेकडून दागिने व रोकड असे मिळून ७ लाख १५ हजार रुपये घेतले.

पांडुरंग खोरे व अंकुश खोरे यांनी सदर महिलेस विश्वासात घेवून ते पेसे परत दिलेच नाही. दागिनेपण घेवुन गेले. आरोपी नं. ३ हा घराच्या बाहेर उभा राहिला व आरोपी पांडुरंग अंकुश खोरे हा महिलेच्या घरात घुसला व ४५ वयाच्या महिलेकडून शरीरसुखाची मागणी करून तिला बळजबरीने झोपण्याच्या खोलीत नेवून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला व तू कोणाला काही सांगितले तर तूझ्या कुटुंबाला जिवे ठार मारून टाकील,

अशी धमकी दिली. ४.६.२०१८ त्यानंतर एक महिन्याचे काळात व १७.१.२०२१९ च्या रात्री ८ च्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला. याप्रकरणी पिडील महिलेने काल बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी पांडुरंग अंकुश खोरे, अंकुश खोरे व एक अनोळखी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!