अहमदनगर :- शहरातील तारकपूर बसस्थानकासमोर एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला.
या छाप्यात एक महिलेला ताब्यात घेतले आहे. तर एका पिडीत बांग्लादेशीय तरूणीची सुट्का कारण्यात आली आहे.

तारकपूर बसस्थानकासमोरील प्रेरणा आर्केड बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. एक एजंट महिला, बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या नंतर याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे वेश्या व्यवसायाला लावलेल्या तरुणीकडे बांगलादेशचा पासपोर्ट आढळून आला आहे.
नगरमध्ये बेकायदा राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींवर पोलिसांनी यापूर्वीही कारवाई केली आहे. परंतु नगरमध्ये पहिल्यांदाच पासपोर्टसह महिला आढळून आली आहे.
पोलिसांनी सुटका केलेल्या संबंधित तरुणीकडे पासपोर्ट, आढळून आला आहे. आणखी काही बांगलादेशी तरुणी या महिलेने नगरमध्ये आणल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
एका बांगलादेशी तरुणीची सुटका केली. तर कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंदविण्यात आलेली महिला नागापूर येथील आहे.
फ्लॅट भाड्याने घेऊन कुंटणखाना चालवत होती. हा फ्लॅट कोणाचा मालकीचा आहे. याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. फ्लॅट मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.