धक्कादायक! रुग्णाशेजारीच ठेवला कोरोनाबाधिताचा मृतदेह

Published on -

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होताना दिसत आहे. प्रशासनही हा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परंतु जिल्हा रुग्णालयात याबाबतीत हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह चार तास दुसऱ्या एका रुग्णाशेजारीच केवळ चादरीने झाकून ठेवला होता़. हा धक्कायदायक प्रकार रविवारी (दि़१९) दुपारी उघडकीस आला़.

या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने यावर आक्षेप घेतला तसेच आपल्या नातेवाईकांना याबाबत कळविले़ त्यानंतर नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले़ त्यांनी तो मृतदेह तेथून हलविण्याची विनंती केली़ मात्र त्यांना कोणीही दाद दिली नाही़

कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्ट्रेचरवर एका चादरीखाली झाकून ठेवला होता़ त्यामुळे संबंधित नातेवाईकाने अतिदक्षता विभागातील या विदारक परिस्थितीचे व्हिडिओ चित्रण काढण्यास सुरुवात केली़ व त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनतर त्यानंतर संबंधित मृतदेह प्लॅस्टिकमध्ये बंद केला़.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News