अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-कोयत्याह धाक दाखवून चौघांनी मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे जिल्ह्यातून दिवे घाटातून दुचाकीवर भावासोबत जाणाऱ्या या मुलीला चौघांनी पळविले आणि तिसगावला आणले मात्र, पाथर्डी पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडत चौघांना ताब्यात घेतले.
आरोपीना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार , 3 आक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता चुलत भावासोबत हि मुलगी जात असताना दिवे घाटात चौघांनी अडविले.
कोयत्याचा धाक दाखवून मुलीला गाडीत बसवून पळवून नेले. लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगा, मुलगी व त्याचे साथीदार तिसगावमधे आल्याचे पोलिसांना समजले होते.
पुणे ग्रामीणचे पोलीस तिसगावमधे आले मात्र त्यांना या चौघांनी हुलकावणी दिली. त्यानंतर रविवारी तिसगाव भागात पोलिस कर्मचारी आप्पासाहेब वैद्य यांना खबर्याकडून मिळालेल्या माहीतीवरुन वैद्य आणि पोलिस हवालदार दळवी,
पोलिस नाईक, सचिन नवगिरे यांनी तिसगाव येथील बाजार समितीच्या मोकळ्या जागेत जाऊन राहुल मेह्त्रे (रा. निलंगा, लातूर), अविनाख चौघुले (रा. दौंड), हमजाद पठाण या तिघांना पकडले.
त्यानंतर एक तरुणासह अपहरण केलेली मुलगी यांना तिसगाव येथून ताब्यात घेतले. लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात पाच जणांना देण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved