अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- पत्नीने दारु खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने गर्भवती पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात ही घटना घडली.
राज्यांतर्गत मद्यविक्रीला शासनाने परवानगी दिली आहे. परंतु याचे विपरीत परिणाम झाल्याच्या अनेक घटना या दोन दिवसांत घडलेल्या आहेत.
या आरोपीने आपल्या २५ वर्षीय पत्नीला चार वर्षाच्या मुलासमोरच गोळी घातली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोपी दीपक याने पत्नीला दारु विकत घेण्यासाठी पैसे मागितले होते. पत्नीने नकार दिल्यानंतर दोघांमध्य शाब्दिक चकमक झाली. यानंतर आरोपीने पत्नीच्या डोक्यात गोळी घातली.
यावेळी त्यांचा चार वर्षाचा मुलगा तिथेच हजर होता. भीतीपोटी त्याने घरातून पळ काढला आणि झुडपात जाऊन लपला. गोळीबार झाल्याचा आवाज ऐकल्याने शेजारीही धावत आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच दाखल झाले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®