धक्कादायक : पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 473 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. काल केवळ 4 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये 44 जणांची तपासणी करण्यात आली. यात 14 जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह तर 30 जण निगेटिव्ह आले आहेत. श्रीरामपूर येथील नगरपरिषद कार्यालयातील पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून आजपासून सोमवारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता नगपरिषद कार्यालय बंद ठेवण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा विभाग वगळून इतर सर्व विभाग बंद केले असून नागरीकांना नगरपरिषदेत येण्यास मानाई करण्यात आली आहे.

या सूचनेची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले. दरम्यान, कोरोना संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेऊन घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यता आले आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेत कोरोनाने शिरकाव केल्यामुळे पालिकेत घबराहट निर्माण झाली आहे. पालिकेत या संसर्गाचा प्रसार होवू नये म्हणून स्वच्छता, पाणीपुरवठा, रुग्णालय या अत्यावश्यक सेवा वगळता पालिकेचा सर्व कारभार पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात

आला असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली. श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत 2303 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 453 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 1117 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. आजपर्यत 11 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment