अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा : सोनईचे रहिवाशी शंकरराव गडाख पाटील यांना काल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली अन् सोनईत तिसऱ्यांदा दिवाळी साजरी झाली. २४ ऑक्टोबरला नेवासा विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला.
पाणीदार शंकरराव आमदार झाले अन् सोनईत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. दि. २९ रोजी दिवाळी सण होता, त्यादिवशीही फटाक्यांची आतषबाजी आणि सोमवारी (दि. ३०) पाणीदार आमदार नामदार झाले. त्यांना राज्यपालांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. या आनंदोत्सवात सोनईत अक्षरश: तिसरी दिवाळी साजरी झाली.
पहाटेपासूनच युवक व कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली. दिवसभरात चौकाचौकात गुलालाची उधळण, वाद्यवृंदे व फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. मुख्य रस्ते, चौक, घरे व दुकानांसमोर फटाके व गुलालाचा मुक्त वापर केला गेला. तसेच सोनईतील पुरातन कालीन हेमाडपंथी महादेव मंदिर त्रिलिंग महादेव पिंडीची पूजा व अभिषेक करण्यात आला.
यावेळी सरपंच दादासाहेब वैरागर. नितीन दरंदले, मनोज वाघ आदी उपस्थित होते. दरम्यान आ. गडाख यांनी मंत्रीपदाची काल शपथ घेतली असता वांजोळी (ता.नेवासा) येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
वांजोळी सेवा सोसायटीचे चेअरमन बद्रीनाथ खंडागळे यांच्यासह प्रमख कार्यकर्त्यांनी पेढे वाटून निवडीचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गावात फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात….
हे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले ….
हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग :- चाकूने भोसकून तरुणाचा खून