अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे रस्त्याने पायी जाणाऱ्या तेरासिंग या ४५ वर्षीय इसमाला बोअरवेलच्या गाडीने धक्का दिल्याने गाडीखाली येऊन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात १७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
बेलवंडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास बेलवंडी गावात एसटी स्टँडवर शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जाताना तेरासिंग (वय ४५, रा. कैथल हरियाणा) याला केए ०१ एमई ५९३३ या बोअरवेलच्या गाडीने धक्का दिल्याने तो गाडीखाली आल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी शिवकुमार मोहनलाल कश्यप (रा. शहापूर, हरियाना) याच्या फिर्यादीवरून बोअरवेल गाडीचालक यशुद्दिन कुमार सन्नानी तामिळनाडू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com