श्रीगोंद्यात ५ लाखासाठी विवाहितेचा छळ

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा :- सौ. सोनाली शरद जगताप, वय २५ रा. साबळेवस्ती, येळपणा रोड, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा येथे सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी माहेरुन ट्रॅक्टर घेण्यासाठी लाख रुपये घेवून असे म्हणत शारीरिक व मानसिक छळ केला.

घटस्फोटाची मागणी करुन मारहाण करत दमदाटी केली. सौ. सोनाली जगताप या तरुणीने याप्रकरणी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा शरद आबासाहेब जगताप, संगिता आबासाहेब जगताप, राहुल आबासाहेब जगताप, पल्लवी राहुल जगताप , महादेव सदाशिव जगताप , सर्व रा. साबळे वस्ती, येळपणे रोड, लोणी व्यंकनाथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment