श्रीगोंद्यातील बारावीच्या विद्यार्थ्याची प्रेमप्रकरणातून आत्महत्या,सात जणांवर गुन्हा

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा :- बारावीच्या विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि ८ एप्रिल रोजी तालुक्यातील बांगर्डा येथील १ विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी पाठपुरावा केला होता.

तब्बल दोन महिन्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अजित संजय गायकवाड (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

याप्रकरणी मुलाचे वडील संजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बांगर्डा गावातील अंकुश बास्कू गायकवाड, आदिका अंकुश गायकवाड, अमोल तेजमल कदम, राजू तात्याबा शेळके,

सोमनाथ अंबादास गायकवाड, किरण संभाजी गायकवाड, तुषार संभाजी गायकवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अजित हा घोगरगाव छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे बारावीला विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. यातील एका आरोपीच्या मुलीशी अजित याचे प्रेमप्रकरण होते.

त्या कारणातून मुलीचे वडील-आई व इतर नातेवाइकांनी अजित गायकवाड याला दमदाटी केली. १८ एप्रिल रोजी अजित गावात जातो असे सांगून गेला.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो परत न आल्याने वडील व इतर नातेवाइकांनी त्याचा शोध घेतल्यानंतर शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन

आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. प्रेमप्रकरणातून मुलाला त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment