श्रीगोंदे :- तालुक्यातील अजूनज परिसरात युवती व गार येथील विनायक पांडुरंग मगर यांच्या प्रेमप्रकरणात प्रियकराने लग्न न करताच शारीरिक संबंध ठेवल्याने प्रेयसीने एका बाळाला जन्म दिला.
मात्र या बाळाला विनायक मगरने स्वीकारण्यास तयार नसल्याने पीडित कुमारी मातेने याबाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल केला.
ही घटना दौंड परिसरात घडली असल्याने गुन्हा दौंड पोलिसात वर्ग करण्यात आला, अशी माहिती श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
अजनुज येथील एक युवती व येथील युवक विनायक मगर हे श्रीगोंदे शहरातील एका महाविद्यालयात सन २०१७ मध्ये शिक्षण घेत होते.
शिक्षण घेताना मुलीची व विनायक मगर यांचे प्रेम जडले. मुलीचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती बारामती येथे खासगी कंपनीत नोकरी करू लागली.
त्यावेळी प्रियकर विनायक मगर याने तिला जुलै २०१८ मध्ये दौंड येथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.यात मुलगीही गर्भवती राहिली.
२५ मार्च २०१९ रोजी दौंड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर प्रियकराने हे बाळ स्वीकारण्यास नकार दिला.
- कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना कशाचीही कमतरता नसते ! त्यांच्या कुंडलीत असतात करोडपती बनण्याचे योग
- ओप्पोचा धमाकेदार फोन भारतामध्ये लॉन्च! मिळेल सोनी IMX890 सेन्सरसह 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि बरेच काही
- कर बचतीकरिता गुंतवणूक पर्याय शोधत आहात? ‘या’ ठिकाणी कराल गुंतवणूक तर होईल लाखोंची बचत
- सिबिल स्कोर उत्तम ठेवायचा तर ‘या’ 5 गोष्टी पाळा! सगळ्याच गोष्टीत होईल फायदा
- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न