श्रीगोंद्यातील युवतीला फसवणाऱ्या तरुणाचा शोध सुरू

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- अजूनज परिसरातील युवतीस फसवून शारीरिक संबंध ठेवणारा गार येथील विनायक पांडुरंग मगर याचा शोध दौंड पोलिस घेत आहेत.

दरम्यान, आरोपी अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पीडित मुलगी बारामती येथील खासगी कंपनीत नोकरी करत असताना मगर याने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

गर्भवती राहिल्यावर ती माझ्याशी लवकर लग्न कर असा हट्ट करू लागली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत राहिली. २५ मार्चला दौंड येथील हॉस्पिटलमध्ये या युवतीने मुलाला जन्म दिला.

हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी तिने प्रियकराला फोन केला असता त्याने सांगितलेे, मी तुला एक रुपयाही देणार नाही, तुला काय करायचे ते कर.

पीडितेने नंतर श्रीगोंदे पोलिसांकडे फिर्याद दिल्यावर गुन्ह्याची नोंद झाली. ही घटना दौंड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment