विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याने पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- विवाहबाह्य संबंधाला विरोध करीत असल्याच्या कारणातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप व सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

कैलास आनंदा नरके (वय ४२, कासारी, शिरुर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एम. आर. जगताप यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.

आरोपी नरके याने पत्नी सविता हिला घरातून नेऊन तिची हत्या करून श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील नदीमध्ये मृतदेह टाकून दिला होता.

या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी बाजू मांडली. आरोपीकडे ट्रक होता. आरोपीचे दहा वर्षांपासून एका महिलेशी अनैतिक संबंध होते.

त्याची माहिती पत्नी सविता हिला झाल्याने पती-पत्नींमध्ये वाद होत होते. त्यातून पती कैलास नरके हा पत्नीला मारहाण करीत होता. १० मे २०१७ मध्ये आरोपीने पत्नीला घरातून नेऊन तिची हत्या करून नगर-दौंड रोडवरील शिवनदीच्या पुलाच्या खालील ओढ्यात मृतदेह फेकून दिला होता.

आई व वडिलांमध्ये भांडणे झाली असून ते घरी नसल्याचे त्यांच्या दोन्ही मुलींनी इतर नातेवाईकांना सांगितले होते. त्यानंतर सविता हिचा नातेवाईकांनी शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही.

त्यानंतर १२ मे रोजी आरोपी घरी आला. त्याने पत्नीबाबत काहीच माहिती नसल्याचा बनाव केला. त्यानंतर आरोपी व इतर नातेवाईकांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनला सविता हरवल्याची तक्रार दिली होती.

काही दिवसांनी बेलवंडी पोलिसांना एक मृतदेह चिखली गावात शिवनदीच्या पुलाखाली आढळून आला. या मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून बेवारस म्हणून दफनविधी केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment