श्रीगोंद्यात मामा फिर्यादी तर भाचा आरोपी!

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा : मामा भाच्याचं एक वेगळंच नात असतं, परंतू श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे मात्र मामा फिर्यादी तर भाचा आरोपी झाला आहे. मामानेच आपल्याच भाच्याविरोधात शेतातील विहिरीवरील स्टार्टर चोरीप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सागर निंभोरे रा. घोडेगाव, असे संशियत आरोपीचे नाव आहे. गोरख दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घोडेगाव शिवारात असणाऱ्या विहिरीवर आपण काल (१) सकाळी विद्युत पंप चालू करण्यासाठी गेलो असता, विहिरीवरील स्टार्टर चोरीस गेल्याचे लक्षात आले.

याबाबत त्यांनी आपल्या बंधूंना माहिती दिली. स्टार्टर कोण चोरी करू शकतो, याची कल्पना असल्याने दरेकर यांनी काल सकाळी अकराच्या सुमारास श्रीगोंदे पोलीस ठाण्यात सागर निंभोरे याने चोरी केल्याची तक्रारी दाखल केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment