श्रीगोंदा :- तालुक्यातील खाकी बाबा देवस्थान जवळ बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसाला मद्यपी तरुणांनी बेदम मारहाण केल्याने पोलीस कर्मचारी संजय कोतकर हे जखमी झाले आहेत.
त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसावरच दारुड्याने हात उचलल्याने कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पिसोरे खांड, येथील आषाढ महिन्यात भरणाऱ्या खाकी बाबांच्या यात्रा उस्तवात पोलिस कॉन्स्टेबल संजय कोतकर यांना जमावाकडून जबर मारहाण झाल्याची घटना घडली.
यावेळी मोठा जमावाने पोलिसाच्या मागे धावत पळत मारहाण केली आहे. आडदांड प्रवृत्तीच्या १५ ते २० इसमांनी हे गैर कृत्य केले आहे.
श्रीगोंदा मांडवगण नगर रोडवर हे देवस्थान आहे. आषाढ महिन्यात तिसऱ्या गुरुवारी हा यात्रा उत्सव भरतो. येथे आजूबाजूच्या गावांतील लोक आनंद साजरा करण्यासाठी येतात. त्यात काही टवाळखोर प्रवृत्ती लोक ही येतात. त्यातून वाद निर्माण होतात.
श्रीगोंदा मांडवगण रोडवर खाकी बाबा देवस्थान शेजारी झालेली वाहनांची गर्दी हटवण्यासाठी श्रीगोंदा रोडवर पोलीस हवालदार अनिल भारती व नगर रोडवर पो.कॉ. संजय कोतकर हजर होते.
मात्र गर्दी वाढल्याने ती सुरळीत करण्यासाठी पो.कॉ. कोतकर यांनी देवस्थानच्या शेजारील वाहने व गर्दी हटवताना तेथील काही गावगुंड प्रवृत्तीच्या
२५ ते ३५ वयोगटातील तरुण व ५० च्या आसपास असलेल्या एका पांढरा पायजमा, शर्ट घातलेल्या इसमाने पोलीस कॉन्स्टेबल कोतकर यांच्यावर राग अनावर होऊन हल्ला चढवला.
अक्षरशः नगर रोड पासून खाकी बाबाच्या देवस्थान समोर भेळीच्या दुकाना समोर पळून पळून त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल संजय कोतकर यास जागीच उलट्या होऊ लागल्याने त्यास सहाय्यक फौजदार अनिल भारती यांनी उपचारासाठी श्रीगोंदा या ठिकाणी तात्काळ हलविले.
- Vivo S50 आणि S50 Pro Mini ‘या’ तारखेला लाँच होणार ! समोर आली मोठी अपडेट
- वीकेंडची सोय झाली…..! 14 नोव्हेंबरला OTT वर रिलीज झाल्यात 3 नवीन वेबसीरिज आणि मूवीज !
- सावधान ! मूळ्यासोबत चुकूनही ‘या’ गोष्टींचे सेवन करू नये, नाहीतर…..; तज्ञांनी दिली मोठी माहिती
- टोलनाक्यावर आता फास्टॅगसोबत गुगलपे, फोनपेने सुद्धा पैसे देता येणार ! 15 नोव्हेंबर 2025 पासून लागू होणार नवा नियम
- रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला दिली मोठी भेट! या शहरांमधून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?












