ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार.

Published on -

श्रीरामपूर – मोटारसायकलला ट्रकने मागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी पावनेसात वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील महात्मा गांधी चौकात घडली.

याप्रकरणी शहर पोलिसांनी सागितलेली माहिती अशी, की सोहेल इमाम शेख (रा. काझीबाबा रोड, वॉर्ड क्रमांक २, श्रीरामपूर) व महेमूद हुसेन शेख (रा. गोंधवणी, वार्ड क्रमांक १) हे श्रीरामपूर बसस्थानकावरून संगमनेर रोडवरून पेपर घेऊन जात असताना गांधी चौकात मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली.

यात महेमूद शेख हे जागीच ठार झाले. याप्रकरणी सलीम मूर्तजा पटेल (रा. मिल्लतनगर, वॉर्ड नं. १) याच्याविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालवून एकाच्या मृत्युस कारणीभूत ठरल्यावरून व मोटारसायकलीचे नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe