विहिरीवरील क्रेन तुटून महिलेचा मृत्यू

Published on -

श्रीरामपूर ;- क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी टाकळीभान येथे घडली.

यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती.

शांताबाई अरुण धोत्रे (वय ३०, अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड) ही महिला कुटुंबासमवेत टाकळीभान येथे विहीर खोदाईच्या कामासाठी आली होती.

शनिवारी दुपारी टेलटॅँक परिसरातील एका विहिरीचे काम सुरू असताना क्रेनची माल्डी तुटून विहिरीत पडली. माल्डी शांताबाईंच्या अंगावर पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe