श्रीरामपूर :- विवाहितेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकून तीच्या पतीस पाठविले, तसेच पैशांची मागणी केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील घुमनदेव येथील एकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबत तालुका पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की घुमनदेव येथील राहुल यननाथ गायकवाड (वय २९) या तरुणाने दि. १७ ऑगस्ट रोजी एका विवाहित महिलेचे फोटो एडीट करून ते फेसबुकवर टाकले तसेच महिलेच्या पतीस व इतरांना पाठविले.

विवाहितेस धमकी देऊन पैशांची मागणी केली. या आरोपावरून गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२०/२०१९ प्रमाणे भा.दं.वि. कलम ३५४ (ड), ३८५, ५००, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आर. एस. पवार हे करीत आहेत.
- ईव्ही प्रेमींना खुशखबर? केंद्रीय अर्थसंकल्पातील ५ मोठे निर्णय जे तुमचा खर्च कमी करतील!
- एवढ्या स्वस्तात 7-सीटर? ग्राहकांची झुंबड, रेनॉल्टच्या विक्रीत ऐतिहासिक वाढ
- AI स्वतःच पोस्ट करतं, भांडतं आणि निर्णय घेतं – सोशल मीडियाचं भवितव्य बदलणार?
- सोशल मीडिया ताब्यात AI? ‘मानव संपणार’ दाव्यांनी इंटरनेट हादरलं
- वारंवार रिटर्न करता? सावध व्हा! Amazon थेट खाते सस्पेंड करू शकते













