शौचालयाच्या टाकीत पडून मजुराचा मृत्यू

Published on -

श्रीरामपूर :- बेलापूर येथील सुखदेव पुजारी यांच्या वस्तीवर शौचालयाच्या टाकीतील मैला साफ करताना एका मुजराचा गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास गुदमुरुन मृत्यू झाला.

दुसरा मजूर अत्यवस्थ आहे. शौचालयाच्या टाकीतील मैला काढण्याचे काम बेलापूर येथील ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे (वय ३५, बेलापूर) व रवि राजू बागडे यांना देण्यात आले होते.

अकरा वाजता हे मजूर टाकीजवळ गेले. पाच फूट खोल असलेली टाकी पूर्ण भरली होती. टाकीवरील झाकण बाजूला करताना गांगुर्डे आत पडला.

त्याला वाचवण्याच्या प्रयत्न करताना बागडे हादेखील टाकीत पडला. ही घटना समजताच जवळपासचे नागरिक टाकीकडे धावले.

त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढले व तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गांगुर्डे यास मृत घोषित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe