मुख्याध्यापिकेची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर :- नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षिका अलकनंदा सोनवणे (वय ५०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्त्येचे नेमके कारण कळले नसले तरी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोन व्यक्तींचा उल्लेख केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

त्या दोन व्यक्तींनी छळ केला की आणखी काही त्रास दिला होता? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

अलकनंदा सोनवणे या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर गेल्या 20-22 वर्षापासून त्या आपल्या आई व वडील यांच्यासोबत इंदिरानगर शिरसगाव येथे राहत होत्या.

काल दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घरातील सर्वजण घरासमोर दळण करत होते. त्याचवेळी अलकनंदा या घरात गेल्या व साडीने गळफास घेतला.

त्या बाहेर येत नसल्याचे पाहून त्यांचे आई-वडील घरात गेले असता त्यांना अलकनंदा यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

अलकनंदा सोनवणे या नगरपालिकेच्या गोंधवणी येथील शाळा क्रमांक 3 मध्ये प्रभारी मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची चर्चा असून

त्यात त्यांनी दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केल्याचे समजते.याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment