चुकीच्या राजकीय निर्णयामुळे श्रीरामपूरकर हवालदिल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- करोनाच्या संकटकाळात गोरगरिबांचे हाल होत असताना श्रीरामपूर मतदारसंघाचे नेतृत्व आधार देण्याऐवजी लोकांकडून सामान गोळा करून स्वतःचे स्टिकर लावण्यात व्यस्त आहे.

या मतदारसंघात झालेल्या चुकीच्या राजकीय निर्णयामुळे नागरिकांना हवालदिल होण्याची वेळ आल्याचा आरोप भाजयुमोचे सरचिटणीस अक्षय वर्पे यांनी केला आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. वर्पे म्हणाले, वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे दोन वेळच्या जेवणाचे हाल सुरू झाले आहेत. अशावेळी भाजप पदाधिकारी, बोटावर मोजण्याइतके नगरसेवक, सामाजिक संस्था, संघटना नागरिकांसाठी झटत आहेत.

ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा नागरिकांना धान्य मिळत नसल्याने त्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळावा, वैद्यकीय सुविधा उभ्या करता याव्यात,

जनजागृतीसह आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रत्येक मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीला 50 लाख रुपये राज्य शासनाने दिले आहे. त्याचा वापर वेळ निघून गेल्यावर करण्यात येणार आहे का ? गे

ल्या महिनाभरात मतदार संघात झालेल्या फसव्या घोषणा देखील पूर्ण झालेल्या नाहीत. भुकेने नागरिक चिंतेत असताना 9 लाखांच्या डेटॉल साबण लोकांनी खायच्या का?

त्याऐवजी रेशनकार्ड नसलेल्या लोकांना 9 लाखांचे धान्य का वाटले गेले नाही ? संपूर्ण मतदार संघात सॅनिटायझर, मास्क का दिले गेले नाही? असा सवालही श्री. वर्पे यांनी उपस्थित केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment