अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातल्या शिंगवे तुकाई येथे असलेल्या एमआयडीसी परिसरात शेख अब्दुल अजीज जैनुद्दीन यांनी स्वमालकीच्या गोदामात दूध पावडरचा साठा ठेवला होता.
मात्र हे गोदाम बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी गोदामाच्या लोखंडी शटरची लॉकची पट्टी कापली आणि कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत गोदामातील साडेतीनशे ते चारशे दूध पावडरच्या गोण्या चोरून नेल्या.
दि. ९ ते १३ जुलै या काळात हा प्रकार घडला. शेख यांनी गोदामाला कुलूप लावले होते. चोरट्यांनी गोदामाचे कडीकोयंडे गॅस कटरने कापून वारणा डेअरी कंपनीच्या दूध पावडरच्या आठ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीच्या १३० बॅगा चोरून नेल्या.
दरम्यान, एकीकडे दुधाला भाव मिळावा, अशी मागणी विविध संघटना आणि शेतकऱ्यांकडून केली जात असतानाच नगर जिल्ह्यात चक्क ३५० ते ४०० दूध पावडरच्या गोण्यांवरच चोरांनी डल्ला मारला.
या चोरीला गेलेल्या दूध पावडरची किंमत तब्बल साडेसहा लाख रुपये आहे. शिंगवे तुकाई ( ता. नेवासा) येथे ही घटना घडली.
गोदामातील दूध पावडरच्या गोण्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली व शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीला गेलेल्या दूध पावडरची किंमत साडेसहा लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन सोनवणे करीत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews