संगमनेर :- तालुक्यातील रायतेवाड़ी परिसरात काल दुपारी १२. ३० च्या सुमारास एक साडेचौदा वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी आधार कार्ड आणण्यासाठी शाळेतून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या आरोपी राजू मोरे (रा. रहिमपूर, संगमनेर) याने विद्यार्थिनीचा हात धरुन विनयभंग केला.
विद्यार्थिनीने जोरजोराने आरडा ओरड केल्याने दुचाकी टाकून राजू मोरे पळाला याच आरोपीने आठ दिवसापूर्वी एका १२ वर्षाच्या विद्यार्थिनीची छेडछाड़ काढल्याची माहिती पुढे आली आहे.
पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरुन आरोपी राजू मोरे विरुद्ध संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोसई कवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेने विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली आहे.
- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













