शेवगाव :- उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधी उमेदवाराने इकडचे दौरे सुरू केले. त्यामुळे त्यांना इथले प्रश्न काय माहीत?
असा प्रश्न उपस्थित करून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले.

गुरुवारी सायंकाळी विखे, आमदार मोनिका राजळे यांनी बाजारपेठेतून प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
विरोधी उमेदवारांपेक्षा आपण कसे योग्य कसे आहोत, हे सांगत आपल्याला मतदान म्हणजे विकासाला मतदान असे विखे म्हणाले.
पाच दिवसांवर आलेल्या लोकसभेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर डॉ. विखे यांनी बोधेगावला तिसरी भेट दिली. ग्रामदैवत साध्वी बन्नोमाॅ दर्ग्यात चादर अर्पण करून दर्शन घेतले.
यावेळी आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, कमल खेडकर, सरपंच सुभाष पवळे, तुषार वैद्य, अनिल चव्हाण उपस्थित होते.
लोकसभेची ही निवडणूक पक्षीय असली, तरी उमेदवारांच्या विचारसरणीचीही निवडणूक आहे. आपण जिल्ह्याचे नेतृत्व सोपवणार आहात, त्यांचा आदर्श घेऊन मुलांचे भविष्य घडणार आहे.
मग तुम्ही या तरुणांसमोर काय आदर्श ठेवणार आहात? आता तुम्ही तुमची प्रतिमा बदलणार कशी? असा सवाल विखे यांनी विचारला.
भविष्यात आपली ओळख ‘शेतकऱ्यांचा प्रश्नांवर बोलणारा नेता’ म्हणून असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही, तर आपण पुढच्या निवडणुकीचा फॉर्मही भरणार नाही, असे ते म्हणाले.
- कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोक कोणासमोरचं झुकत नाहीत ! या लोकांचा स्वभाव कसा असतो ?
- घरकुल योजनेत ऐतिहासिक बदल ! आता जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा मिळणार ‘इतके’ अनुदान
- दूध देणाऱ्या गाई – म्हशी खरेदी करण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान ! अर्ज कुठं करणार?
- 1000 किलोमीटरचा प्रवास आता फक्त आठ तासात! वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत लोकसभेतून समोर आली मोठी अपडेट
- राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर ! कर्जमाफीसाठीची प्रक्रिया झाली सुरु, फडणवीस सरकारकडून राज्यातील बँकांना महत्त्वाचे आदेश













