अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सिद्धार्थनगर, तोफखाना, नालेगाव पाठोपाठ आडतेबाजार, डाळमंडई परिसरही कन्टेन्मेंट झोन झाल्याने मध्यवर्ती नगर शहराचा निम्म्यापेक्षा जास्त भाग लॉकडाऊन झाला आहे.
त्यामुळे शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, गंजबाजार, सराफ बाजार, आडतेबाजार, दाळमंडई परिसरातील दुकाने बंद झाल्याने नेहमी गजबजलेल्या या परिसरात आज (दि.30) शुकशुकाट दिसून येत होता.
शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळून येत आहेत त्यामुळे यापुर्वीच तोफखाना व सिद्धार्थनगर परिसर 7 जुलैपर्यंत कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे.
त्यापाठोपाठ नालेगावही 8 जुलैपर्यंत कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आलेले आहे. शनिवारी (दि.27) आडतेबाजार परिसरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली होती.
त्यामुळे व्यापार्यांनी स्वत:हून रविवार, सोमवार व मंगळवार असे तीन दिवस उत्स्फुर्तपणे आडतेबाजार, दाळमंडई परिसरातील व्यवहार बंद ठेवण्याची घोषणा केली होती त्यानंतर रविवारी सायंकाळी आडते बाजार परिसरात पुन्हा पाच व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या.
त्यामुळे कोरोनाचा संसर्ग इतर भागात पसरू नये म्हणून आडतेबाजार, दाळमंडई परिसर 14 दिवसांसाठी सोमवारी (दि.29) दुपारी 4 ते 12 जुलै रोजीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत कन्टेन्मेंट झोन करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
त्यामुळे नेहमी गजबजलेला असणारा हा परिसर मंगळवारी (दि.30) सकाळ पासून सुनासुना दिसून येत होता. यापुर्वीच्या तीन कन्टेन्मेंट झोन नंतर चौथा कन्टेन्मेंट झोन झाल्याने निम्म्यापेक्षा जास्त शहर लॉकडाऊन झाले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews