आमदार मुरकुटेंची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोणाला कोणत्या गावात किती मतदान झाले, हे प्रसिद्ध झाल्यावर राजकारण पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापू लागले आहे.

गडाख व मुरकुटे यांच्या गावांमध्ये विरोधी उमेदवारांना मताधिक्य मिळाल्यामुळे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मुरकुटेंच्या गावात काँग्रेसला लिड, मुरकुटेंनी लोखंडेंचे काम केलेच नाही अशा चर्चेमुळे मुरकुटे व भाजपची बदनामी झाल्याप्रकरणी नेवासे पोलिसात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

आठ जणांच्या विरोधात तक्रार देण्यातआली आहे. भाजपचे नगरसेवक सचिन नागपुरे व तालुका उपाध्यक्ष दिलीप नगरे यांनी वेगवेगळ्या तक्रारी दिल्या आहेत.

तक्रारीत ईश्वर उगले व पांडुरंग होंडे यांनी ज्ञानेश्वर माउली ग्रुप, मोबाइल शॉपी ग्रुप, मराठ्यांचा राजकीय अखाडा, जय श्रीराम, भाऊसाहेब फोलाणे, दिव्य नेवासे या ग्रुपवर बदनामीकारक मजकूर केला असे नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment