अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिंगणापुरात प्रथमच शनिअमावस्यानिमित्त उत्सव भाविकांविना साजरा करण्यात आला.
दरवर्षी चार ते पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा शनिअमावस्या उत्सव शनिवारी मात्र दोन पुरोहित, सुरक्षा व स्वच्छता कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाला.
त्र्यंबक महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. लाखोंच्या उपस्थितीत वाजत गाजत, विविध उपक्रमांनी साजरा होणारी शनी अमावस्या यंदा मात्र कोरोना संकटामुळे शनिशिंगणापुरात शुकशुकाट दिसून आला.
यात्रेने रस्ते, पूजा साहित्य दुकाने, हॉटेल, खेळण्याची दुकाने, भोजनालये, विश्रामगृहासह मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जात होता. मात्र, यावर्षी सर्व परिसरात शुकशुकाट दिसत होता.
शिंगणापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसतराव भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व देवस्थान कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews