‘त्या’ प्राचार्य मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, झाले असे काही …वाचा सविस्तर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे प्राचार्य अशोक गुंजाळ व त्यांची पत्नी उज्वला गुंजाळ (रा. मालदाड रोड) यांना दहाव्याच्या विधीत मारहाण करण्यात आली होती. 

हा प्रकार सोमवार दि. 19 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडला होता. त्यानंतर ज्या महिलांना या दाम्पत्यास मारहाण केली. त्यांच्या विरोधात उज्वला अशोक गुंजाळ यांनी याप्रकरणी सोमवारी सायंकाळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चिखलीच्या चार महिलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत उज्वला गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवार दि. 19 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास आम्ही निमगाव खुर्द येथे पुनम कासार हिच्या दहाव्याच्या विधीसाठी गेलो होतो.

तेथे पुनमचे नातेवाईक आणि इतर लोक देखील आले होते. हा विधी आटपत आल्यानंतर तेथील काही महिलांनी आम्हाला शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरूवात केला. मात्र, आम्ही काही एक बोललो नाही.

या दरम्यान पल्लवी सौरभ हासे, संगिता विलास हासे, स्वाती नवनाथ हासे व लिला हासे या महिला आल्या व त्यांनी माझ्या पतीस मारहाण करण्यास सुरूवात केली.

हा प्रकार मी पाहिला असता मी पतीस सोडविण्यासाठी गेले तर या महिलांना मला देखील मारहाण केली. तसेच या दरम्यान माझ्या गळ्यातील सोन्याचे गंठण गहाळ झाले आहे. असे उज्वला यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe