तुमच्यावर बलात्कार करणार आहोत, अशी धमकी देत दरोडेखोरांनी तिच्यासोबत केले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- श्रीगोंदे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर घोडेगाव रस्त्यानजीक पारधी समाजाच्या महिलेच्या झोपडीवर १४ एप्रिलच्या मध्यरात्री दरोडा पडला. महिलेने विरोध केला असता तिच्यावर शस्त्राचा वार करत बलात्काराची धमकी देण्यात आली.

या महिलेच्या डाव्या हाताला अंगठ्याला जखम झाली आहे. ही महिला तिच्या १२ वर्षांच्या मुलीबरोबर झोपडीबाहेर झोपली होती. तोंड बांधून आलेल्या सात दरोडेखोरांची चाहूल लागून जाग्या झालेल्या महिलेला त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचे डोरले ओरबाडले.

महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या डाव्या हातावर एकाने वार केला. इतरांनी झोपडीत शिरून वस्तूंची उचकापाचक करत पैसे शोधण्याचा प्रयत्न केला.

तुमच्यावर बलात्कार करणार आहोत, अशी धमकीही त्यांनी पीडितेला दिली. महिलेने लहान मुलीसाठी गयावया करून तुम्हाला काय न्यायचे ते न्या, पण माझ्या मुलीला सोडा अशी विनवणी केली.

सुमारे अर्धा तास चोरांनी झोपडीत शोधाशोध केली. नंतर ते घोडेगावच्या दिशेने निघून गेले. दरोडेखोर गेल्यानंतर घाबरलेली ही महिला मदतीसाठी धावत पळत जवळच असलेल्या पत्रकार चंदन घोडके यांच्या घरी केली.

नंतर घोडके यांनी श्रीगोंदे पोलिसांना फोनवर याबाबत माहिती दिली. सहायक निरीक्षक सतीश गावित तातडीने घटनास्थळी आले. परिस्थितीची पाहणी करून वरिष्ठांना कळवण्यात आले.

पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अतिरिक्त अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक निरीक्षक राजेंद्र सानप,

कर्जतचे पोलिस निरीक्षक, श्वान पथक व ठसेतज्ज्ञांसह मोबाइल सेलचे दीपक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment