अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी केले असे काही….

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-नगर तालुक्यातील वाळकी येथील एका ओढ्यातून वाळू उपसा करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत एक ब्रास वाळू व विना नंबरचा ट्रॅक्टर, ट्राली असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात

ट्रॅक्टर चालक पंडीत तुकाराम जुंदरे (वय २६) व मालक दिनेश सखाराम कासार (वय २५ दोघे रा. वाळकी ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर असे की, वाळकीच्या ओढ्यातून चोरून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती.

या मिळालेल्या माहितीनुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बी.बी. धुमाळ, पोलीस शिपाई जाधव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस नाईक कदम करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment