स्टेट बँकेचे शेतकऱ्यांना गिफ्ट; अवश्य घ्या ‘ह्या’सेवेचा लाभ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने शेतकऱ्यांना एक मोठ गिफ्ट दिल आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींसाठी शेतकऱ्यांना बँकेत जावे लागत होते. पण आता शेतकरी आपली कामे घरबसल्या होणार आहेत. आणून घेऊयात एसबीआय अर्थात स्टेट बँकेच्या या सुविधा विषयी-

घरी बसून ‘हे’ होतील कामे –

शेतकरी घरात बसूनच आपल्या किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) ची मर्यादा वाढवू शकतात. आतापर्यंत या कामासाठी शेतकऱ्यांना बँक शाखेत जाऊन तासनतास प्रतीक्षा करावी लागे. परंतु एसबीआयने आपल्या योनो कृषी अ‍ॅपमध्ये किसान क्रेडिट कार्ड पुनरावलोकन सेवा सुरू केली आहे. आता केसीसीची मर्यादा वाढविण्यासाठी शाखांत जाण्याची गरज भासणार नाही.

 केवळ ४ क्लिकमध्ये होईल काम –

एसबीआयच्या म्हणण्यानुसार योनो कृषी अॅपमध्ये केसीसी पुनरावलोकन पर्याय वापरण्याची पद्धत अधिक सोपी केली गेली आहे. कोणतेही कागदपत्र न घेता शेतकरी चार स्टेपमध्ये किसान क्रेडिट कार्ड मर्यादा बदलू शकतील. एसबीआयच्या म्हणण्यानुसार योनो एग्रीकल्चरमध्ये सुरू करण्यात आलेल्या या सुविधेचा 75 लाखाहून अधिक शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

 या सुविधेचे इतर फायदे-

एसबीआयच्या म्हणण्यानुसार केसीसीच्या समीक्षा व्यतिरिक्त योनो कृषी प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांना योनो खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध होईल. दुसरीकडे, ‘योनो सेव्हिंग्ज’ शेतकर्‍यांच्या गुंतवणूकी आणि विमा गरजांसाठी आर्थिक सुपर स्टोअर म्हणून काम करेल.

या व्यतिरिक्त ‘योनो मित्र’ कृषी सल्लागार सेवादेखील देणार आहे. याशिवाय योनो शेतीशी संबंधित वस्तू जसे की खत व बियाणे खरेदी-विक्रीसाठी ऑनलाईन मार्केट सारख्या सेवाही देईल. सध्या एसबीआयने आपले कृषी अॅप 10 भाषांमध्ये लाँच केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment