अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : किरकोळ वादातून दोघांत तुफान हाणामारी झाली. नागपूर येथील जय मल्हार नगर येथे ही घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर भिकाजी घारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कौटुंबिक वादातून अमोल संजय शिंदे याने घारे यांच्या डोक्यात दगडाने मारले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
मारहाणीत घारे हे जखमी झाले. याप्रकरणी अमोल शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधी गटाच्या अमोल संजय शिंदे यांनीही पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
घारे यांच्या डोक्यात मोटरसायकलचे स्टॅन्ड फेकून मारल्याने त्यांना डोक्यात दुखापत झाली. याप्रकरणी ज्ञानेश्वर भिकाजी घारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title – Stormy thunderstorms between the two