अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन’ सुरू असताना नियमाचे उल्लंघन करून घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुकुंदनगर, आलमगीर परिसरात सील करण्यात आला आहे. या परिसरातील एक पोलिस कर्मचारी आयुब शेख हा त्याच्या पत्नीला घेऊन दुचाकीवरून बाहेर चालला होता.
हा प्रकार लक्षात येताच त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलिस कर्मचारी असल्याचे सांगितले. तो राहुरी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तो ड्युटीवर जाण्यासाठी बाहेर पडण्याऐवजी पत्नीला घेऊन दुचाकीवरून फिरत होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 188, साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याने ही कारवाई करण्यात आली.‘लॉकडाऊन’ चे उल्लंघन केल्याप्रकरणी आता पोलीस कर्मचाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®