अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तालुक्याला ८ कोटी ६८ लाख रुपयांचा प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत पीकविमा मंजूर झाला असून त्याचा लाभ तालुक्यातील २० हजार ७३८ शेतक-याना होणार आहे.
प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील सन २०१८-१९ ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांसाठी एकूण २० हजार ७३८ शेतक-याना सुमारे ८ कोटी ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. विमा रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यावर थोड्याच दिवसात वर्ग होणार असल्याची माहिती आमदार पाचपुते यांनी दिली.

विमा कंपन्यांकडे पिकविम्याची रक्कम भरूनही तालुक्यातील शेतकरी ज्वारी, गहू, हरभरा पिकविम्याच्या लाभापासून वंचित होते यासाठी आमदार पाचपुते हे पीकविमा कंपन्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शेतक-याना विमा मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील होते
पाचपुते यांनी केलेल्या प्रयत्नामुळे तालुक्यातील २० हजार ७३८ शेतक-याना ८ कोटी ६८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झालेला असून सदरची रक्कम लवकरच शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग होणार आहे. आमदार पाचपुते यांचे शेतक-यांनी मानले आभार ! कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून
शेतक-यांच्या मालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला असताना अशा संकटाच्या काळात आमदार पाचपुते यांनी कोणतीही प्रसिद्धी न करता शेतक-याना पिकविम्याची रक्कम मंजूर करून घेतली त्यामुळे शेतक-याना मोठा आधार मिळणार आहे.
शेतकरी अडचणीत असताना गरजेच्या वेळी पिकविम्याची रक्कम मिळणार असल्याने शेतक-यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved