पोल्ट्री फार्मच्या छताला गळफास घेत आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-अकोले तालुक्यातील विरगाव येथील तरुण योगेश रामनाथ बर्डे याने पोल्ट्री फार्मच्या छताच्या अँगलला दोरी लावून गळफास घेवून आत्महत्या केली.

त्याचा मृतदेह लटकलेला आढळून आला. तशी खबर शेतकरी मदन गंगाधर आंबरे, रा. हिवरगाव आंबरे यांनी अकोले पोलिसात दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान घटनास्थळी पोनि परपार यांनी भेट दिली, योगेश बर्डे याने नेमकी का आत्महत्या केली ? कशी केली? का आणखी काही प्रकार आहे? याचा पुढील तपास पोना गोराणे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment