दोन दिवसात दोन कामगारांच्या आत्महत्या,एक माजी मंत्र्याच्या कारखान्यातील कामगार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द )येथे दोन दिवसांत दोनजणांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर असे की, बुधवारी (दि.२४)रात्री मोहन शिवाजी शिरसाठ (वय ४५ वर्ष) यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेतला. शिरसाठ हे लोणी येथील चित्रालय चौकात मध्ये एका गँरेजमध्ये काम करत होते.

गुरूवारी (दि.२५) सकाळी प्रवरानगर येथे चटई चाळीत राहात असलेल्या चांगदेव किसन भंडागे (वय ५०) यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

भंडागे हे विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात हंगामी कामगार होते. त्यांचे मुळ गाव राहाता तालुक्यातील आडगांव बुद्रूक हे आहे. या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली, याबाबत लोणी पोलिस तपास करत आहेत.

वैफल्यग्रस्त भावनेतून या दोघांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment