अहमदनगर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत.
डॉ. सुजय यांना भाजपकडून दक्षिणेची उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून ही उमेदवारी देण्यात आली.

या पार्श्वभूमीवर गांधी यांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्यामुळे भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सुजय यांचे नाव जाहीर झाल्यापासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते हे त्यांच्यापासूनच दूरच असल्याचे दिसते.
नाराज झालेेले भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षात नव्याने आलेल्या डॉ. सुजय विखे यांच्यापासून चार हात दूरच असून, विखेंच्या बैठकांना आगरकर गट वगळता पक्षातील अन्य कार्यकर्ते दांडी मारत आहेत.