अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- महापालिकेत भाजप- राष्ट्रवादी एकत्र आल्याने टीका झाली. एकत्र येण्यामागे कुठलाही राजकीय हेतू नव्हता. नगरच्या जनतेसाठी भाजप-राष्ट्रवादीची युती झाली.
गतवेळी महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले होते. राजकीय योग जुळून आला तर पुढील काळातही आम्ही एकत्र येऊ, असे सूतोवाच खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर येथे केले.]
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या समारोपाचा कार्यक्रम येथील माऊली सभागृहात रविवारी झाला. यावेळी विखे बोलत होते.
माजी आमदार शिवाजी कर्डिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार संग्राम जगताप यांच्यासह अन्य जण उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले कि, महापालिकेत भाजप- राष्ट्रवादी एकत्र आल्याने टीका झाली. मात्र नगरच्या जनतेसाठी भाजप-राष्ट्रवादीची युती झाली.
शहरातील उड्डाणपूल, अमृत पाणी योजना, भुयारी गटार योजनेचे काम थांबले होते. भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यानेच ते मार्गी लागले.
उड्डाणपुलाच्या कामात भूसंपादनाची अडचण होती. केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरवा केला. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला.
विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार जगताप आणि खासदार म्हणून आपण स्वत: वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यामुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागले, असे विखे म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम