विवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर :- दत्तनगर सूतगिरणी फाटा येथील गॅरेजजवळ कडू तात्याबा बागूल (वय ४०, दत्तनगर) या विवाहित तरुणाचा मृतदेह आढळला.

रवी विखे यांना बागूल झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी टिळकनगर कामगार पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे यांना सांगितल्यावर त्यांनी बागूल यांना उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

ग्रामपंचायत सदस्य मोहन आव्हाड यांनी पोलिसांना कळवले. सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

मृत बागूल हे आरपीआयचे भीमराज बागूल व ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ बागूल यांचे चुलतभाऊ होते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment