उत्तम पर्जन्यामुळे नगरला टँकरमुक्ती

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुष्काळ हा नित्याचाच ठरलेला. अगदी उन्हाळा संपून पावसाळ्याच्या मध्यापर्यंत टँकर सुरु असतात.

परंतु याववर्षी मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या झपाट्याने कमी होत गेली.

सध्या करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मोठा खर्च आणि यंत्रणा वापरावी लागत असलेल्या प्रशासनालाही हा मोठा दिलासा आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. समाधानकारक पाऊस होत असल्याने टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना सुरू असणाऱ्या टँकरची संख्या कमी झाली.

सध्याच्या परिस्थितीमध्ये नगर जिल्ह्यात पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी केवळ तीन टँकर सुरू आहेत. या टँकरद्वारे जामखेड नगर परिषद हद्दीमधील ४ हजार ७५० नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतोय.

जिल्ह्यामध्ये मागील वर्षी टँकरच्या आकडेवारीने उच्चांक गाठला होता. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ५ जुलै २०१९ रोजी जिल्ह्यात तब्बल ७६४ टँकर सुरू होते. त्यातुलनेत यंदाची परिस्थिती ही खुपच चांगली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News