उसाच्या ट्रॉलीखाली सापडून शिक्षकाचा मृत्यू.

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर :- शहरातील नेवासा रस्त्यावरील रेल्वे उड्डानपुलावर ऊसवाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका शिक्षकाचा मृत्यू झाला.काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

प्रगतीनगर येथे राहात असलेले अशोक शंकर घाटविसावे हे दुचाकीवरून श्रीरामपूरकडून आपल्या घरी प्रगतीनगर येथे जात होते. तर ट्रॅक्टर श्रीरामपूरच्या दिशेने चालला होता.

ट्रॅक्टरला दोन ट्रॉली होत्या. श्रीरामपूर व शिरसागवच्या हद्दीवर असलेल्या रेल्वे उड्डानपुलावर घाटविसावे आले असता समोरून आलेल्या ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीखाली त्यांची दुचाकी सापडली.

घटना घडल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या घाटविसावे यांना पोलिसांनी तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment