वाळूउपसा करणाऱ्यांना तहसीलदारांचा दणका ! तब्ब्ल चाळीस लाख…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- अंधाराचा फायदा घेऊन वाळूउपसा करणाऱ्यांना श्रीगोंदा तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी आज चांगलाच दणका दिला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे शिवारातील माळवाडी येथील घोडनदीपत्रात आज पहाटेच्या चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान तहसीलदारांनी धाड टाकली.

ठिकाणी अवैध वाळूउपसा करणाऱ्या अंदाजे चाळीस लाख रुपये किंमतीच्या ४ बोटी उध्वस्त केल्या तसेच चोरटी,बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारी अंदाजे दहा लाख रुपये किंमतीची एक ट्रक वाळूसह बेलवंडी पोलीस स्टेशनला जमा केली आहे.

सदर कारवाई ही श्रीगोंदा तहसीलदार प्रदीपकुमार पवार,मंडळ अधिकारी प्रशांत कांबळे,मंडळ अधिकारी भारत चौधरी,तलाठी मिलिंद पोटे,तलाठी पवन शेलार,तलाठी स्वप्नील होळकर या महसूल पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe