अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे एका दाम्पत्यास कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.हे जोडपे कल्याणहून आले होते.
त्यामुळे, आरोग्य विभागाने 13 जणांना क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांचे स्वॅब घेण्यासाठी संगमनेरला पाठविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, समशेरपूर येथील ढोनरवाडी येथील एक कुटूंब कामानिमित्त कल्याण येथे राहत होते. लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व कामधंदा विस्कळीत झाला. मात्र, तेथे थांबून देखील त्यांना अस्वस्थ वाटत होते.
त्यामुळे, समशेरपूर येथील त्यांच्या एका नातेवाईकाने एक गाडी करुन त्यांना गावाकडे आणण्यासाठी थेट कल्याण गाठले. गेल्या चारपाच दिवसांपुर्वी ते गावी आले होते.
मात्र, त्यांना दोन दिवसांपुर्वी श्वास घेण्यासाठी प्रचंड त्रास होऊ लागला होता. तरी काहीतरी किरकोळ म्हणून दुर्लक्ष करण्यात आले.
हा त्रास जास्त झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईनांनी नाशिकला तपासणीसाठी नेले. तेथे दोघांचे स्वॅब घेतले असता त्या पतीपत्नीस कोरोनाची बाधा झाल्याचे आहवाल आले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews