त्या मृत बिबट्याचा वैद्यकीय अहवाल झाला प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- मुळा डाव्या कालव्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचा पाटाच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. तसा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने आता त्याच्या मृत्यूवर होणार्‍या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात आरडगाव परिसरात मुळा डाव्या कालव्यात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.

बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी या बिबट्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभाग व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव वाकडे यांनी पंचनामा केला.

दरम्यान बिबट्याचे मृत्यूचे खरे कारण समजू न शकल्यामुळे परिसरातून उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. मात्र, बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण अखेर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने सर्वच गोष्टींवर पडदा पडला आहे.