अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील भानगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. पुन्हा त्याच ठिकाणी छापा टाकून ७ जुगाऱ्यांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पंचायत समितीच्या सदस्याचे पती व माजी उपसभापती सुरेश गोरे याच्यावर दोन्ही वेळा गुन्हा दाखल करण्यात आला. १६ सप्टेंबरला पोलिसांनी ५ जुगाऱ्यांना पकडले होते. पुन्हा जुगार अड्डा चालू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सानप यांच्या पथकाने रविवारी भानगाव शिवारात धनगरवस्तीजवळ छापा टाकला.
पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा हार-जितीचा जुगार खेळताना ७ जण आढळले. अनिल मधुकर लगड, रवि गोविंद पाठक, जावेद गुलाब बेपारी,
महमंद शेख, स्वप्निल प्रवीण पितळे, बाळू अप्पा नवले, सुरेश पंढरीनाथ गोरे यांच्याकडून २,८२,६०० रूपये रोख, ६६ हजारांचे मोबाइल, चार मोटारसायकली व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved