जे व्हायला नको तेच झाले ! त्या धाडसी मुलीने सोडले प्राण, रुग्णालयातच झाला मृत्यू …

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- देशात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजावला असून देशभरातून कोरोना रूग्णांची येणारी सर्व छायाचित्रे आपल्याला भयभीत करत आहेत. बरीच चित्रे आणि व्हिडिओ लोकांना रडवत आहेत.

दरम्यान, एका व्हिडिओमध्ये एक मुलगी लव्ह यू झिंदगी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दुःखद बातमी अशी आहे की गुरुवारी सायंकाळी मुलीने आपला जीव गमावला. डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत.

लोक म्हणतात की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण संपूर्ण उत्साहाने जगा. परंतु हे काम फारच कमी लोकांना करता येते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लव्ह यू जिंदगी या गाण्यावर नृत्य करणाऱ्या एका कोविड पेशंटचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता.

हा व्हिडिओ कोरोना काळातील भयानक आणि वेदनादायक चित्रांदरम्यान एक आशेचा नवीन किरण असल्याचे सिद्ध झाले. पण आता त्या गाण्यावर नृत्य करणारी ती प्रेरणादायी मुलगी या जगात राहिली नाही. तिचे निधन झाले आहे.

ट्विटरवर डॉ. मोनिका लांगेह यांनी रुग्णालयाच्या कोविड इमर्जन्सी वॉर्डमधील या 30 वर्षीय रूग्णाची कथा एका व्हिडिओ द्वारे शेअर केली आहे, जो बर्‍याच काळापासून ट्रेंड होताना दिसत आहे.

ट्विटमध्ये 8 मे रोजी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मोनिका लांगेह यांच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ह्या मुलीला रुग्णालयात आयसीयू बेड मिळू शकला नाही, म्हणून तिला कोविड इमरजेंसी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. तिला एनआयव्ही (नॉन इनव्हसिव व्हेंटिलेशन) वर ठेवले होते, त्याव्यतिरिक्त रेमेडेसवीर आणि प्लाझ्मा थेरपी देखील दिली गेली होती.

डॉ. मोनिका लांगेह म्हणाल्या की या मुलीची इच्छाशक्ती खूप मजबूत होती . वॉर्डमध्ये दाखल झाल्यानंतर तिने आपले मनोबल वाढविण्यासाठी काही संगीत वाजवू का असे विचारले. डॉक्टरने शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांचा 2016 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘डियर जिंदगी’ मधील ‘लव यू झिंदगी’ हे गाणे वाजवले ज्यावर तिने नाचण्यास सुरूवात केली.

डॉ. मोनिका लांगेह यांनी शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले कि ‘Lesson: Never lose hope ‘ म्हणजे परिस्थिती काहीही असली तरी आशा गमावू नका. आता त्या मुलीने कधीही आशा सोडली नाही परंतु तरी तिला कोरोनाने पराभूत केले.

कोविडशी लढणारी ही मुलगी केवळ 30 वर्षांची होती आणि तिला आयसीयू बेड मिळाला नाही. मुलगी एनआयव्ही, रेमेडीसावीर, प्लाझ्मा थेरपी इत्यादींच्या पाठिंब्यावर जगत होती. ती एक दृढ इच्छाशक्ती असलेली एक मजबूत मुलगी होती.

त्यावेळी डॉक्टरांकडून सांगण्यात आले की मुलीची प्रकृती सुधारत आहे आणि तिला रुग्णालयातून सोडण्याचा विचारही करीत आहेत . पण मग अचानक मुलीची तब्येत ढासळली आणि तिने हे जग सोडले आणि कायमची निघून गेली .

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्या मुलीचे सर्वांकडून खूप कौतुक झाले होते . प्रत्येकजण तिच्या इच्छाशक्तीला सलाम करीत होते , आशीर्वाद देत होते, परंतु कदाचित नशिबात दुसरेच काहीतरी लिहिलेले होते .

  • बातमी आवडल्यास मित्र परिवारासह शेअर करा 
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe