भाऊसाहेब वाकचौरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Published on -

शिर्डी :- लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उभे असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली असली, तरी त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.

निवडणुकीला भाजप-शिवसेना मित्रपक्षांसमवेत सामोरे जात आहे. शिर्डी मतदारसंघ शिवसेनेकडे असून मित्रपक्ष भाजपचे नेते व माजी खासदार वाकचौरे अपक्ष उभे आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी पक्षशिस्तीचे कारण पुढे करत वाकचौरेंची पक्षातून हकालपट्टी केली. तथापि, वाकचौरे उमेदवारीवर ठाम असल्याने पेच वाढला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe